चोरीच्या संशयावरून 2 मुलांना झाडाला बांधून मारहाण

August 8, 2011 3:05 PM0 commentsViews: 5

08 ऑगस्ट

भंगाराच्या दुकानात चोरी केल्याचा आरोप करत चंद्रपूर जिल्हयातील वरोरा इथ दोन अल्पवयीनं मुलांना दोराने झाडाला बांधून त्यांचे मुंडन करण्याचा लाजिरवाना प्रकार उघडकीस आला. वरोरा पोलीस स्टेशनला लागून असलेल्या भंगारच्या दुकानात चोरी केल्याच्या संशयावरून या मुलांना सकाळी सातच्या सुमारास भंगार विक्रेत्याने भरचौकात असलेल्या झाडाला बांधून त्याचे मुंडन केले अनेक तास या मुलांना पाणी ही दिलं नाही ऐवढ्यावरच हे अघोरी कृत्य थांबले नाही तर त्यांना मारहाण ही करण्यात आली यावर मात्र पोलिसांनी आतापर्यंत कोणतीही कारवाई केली नाही.

close