तेलगळतीची माहिती द्या !

August 8, 2011 4:25 PM0 commentsViews: 3

08 ऑगस्ट

एम व्ही रॅक या जहाजाची तेलगळतीच्या घटनेचे पडसाद आज विधिमंडळात उमटले. ही तेलगळती कशामुळे आणि कोणत्या जहाजातून होतेय याची माहिती द्या असे असे आदेश विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांनी सरकारला दिले. पुढच्या दोन दिवसांत या प्रकरणी स्पष्टीकरण देण्याचे आदेश सभापतींनी दिले आहेत. तेलगळतीच्या मुद्द्यावर शिवसेनेच्या आमदार नीलम गोर्‍हे यांनी विधानपरिषदेत औचित्याचा मुद्दा मांडला होता. त्यावर सभापतींनी हे आदेश दिले आहेत.

close