पोलिसानाच चोरांकडून बेदम मारहाण

August 8, 2011 11:31 AM0 commentsViews: 4

08 ऑगस्ट

चोरी करण्यासाठी आलेल्या चोरांना पकड्याण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच चोरांकडून बेदम मारहाण झाल्याची घटना पिंपरी-चिंचवड मध्ये घडली. पिंपरी-चिंचवडच्या अजमेरा कॉलनी जवळील सोसायटीमध्ये काल मध्य रात्री ही घटना घडली.

या सोसायटीतील राधाकृष्णन आणि सलीम हे रहिवासी काही दिवसांसाठी बाहेर गावी गेले होते त्या वेळी चोरांना त्यांच्या घरात घुसुन चोरी केली. दरम्यान शेजार्‍यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले. पण तिथं जाणारे पोलीस निशस्त्र असल्याचे पाहुन चोरांना पोलिसांनाच बेदम मारहाण केली.

या घटनेत पिंपरी-पोलीस स्टेशनचे तीन पोलीस जखमी झाले. सध्या त्यांच्यावर वाय.सी.एम. हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु आहे. पिंपरी स्टेशअनच्या पोलिसांनवर गुन्हेगारांकडुन हल्ले झाल्याची ही तिसरी घटना आहे. तर शहरातील पोलिसांवर झालेल्या हल्याची ही 6 वीघटना आहे. केवळ आणि केवळ पोलिसांचा गुन्हेगारावरील वचक कमी झाल्यामुळेच.

close