खाजगी कंपन्यांनी बुडवला कोट्यावधीचा महसूल !

August 8, 2011 2:43 PM0 commentsViews: 2

08 ऑगस्ट

मुंबई आणि पुणे परिसरातील सहा खाजगी कंपन्यांना सरकारी जमिनीचे परस्पर हस्तांतरण होऊन सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाल्याचे आता उघड झाले आहे. लोकलेखा समितीने आज विधानसभेत सादर केलेल्या अहवालात ही धक्कादायक बाब उघडकीस आली.

मुंबई आणि ठाण्यातील मदिन फूड इंडस्ट्रीज, सेंटॉर हॉटेल, प्रसन्न मेटॅलिक्स तर पुण्यातील कल्याणी स्टील आणि एम डायकेम, तसेच रायगडमधील आयपीसीएल(IPCL) या सहा खासगी कंपन्यांना सुमारे 79 लाख चौरस मीटर जागा परस्पर हस्तांतरीत करण्यात आली आहे.

शासकीय यंत्रणांनी या हस्तांतरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा ठपका लोकलेखा समितीच्या अहवालात करण्यात आला. या सर्व जमीन व्यवहारात सरकारचा तब्बल 133 कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याचाही ठपका अहवालात ठेवण्यात आला. त्यामुळे याप्रकरणी संबंधित अधिकार्‍यांवरील जबाबदारी निश्चित करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची शिफारसही या अहवालात करण्यात आली.

close