‘खड्‌ड्यांबाबत चलता है, चलने दो’ चालणार नाही – मुख्यमंत्री

August 9, 2011 9:55 AM0 commentsViews: 2

09 ऑगस्ट

राज्यभरातील रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले आहेत. या खड्‌ड्यांबाबत यापुढे 'चलता है चलने दो 'असं चालणार नाही अशी कडक भूमिका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली आहे. दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडतात. कोट्यवधी रुपये खर्चून हे रस्ते दुरूस्त केले जातात.

पण पुढच्या वर्षी परत तीच परिस्थिती येते.याप्रकरणी आता चालढकल चालणार नाही असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिला. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला त्यांनी हे उत्तर दिले. त्याचबरोबर खड्‌ड्यांबाबत केवळ कॉन्ट्रॅक्टर्सना फासावरून लटकवून हा प्रश्न सुटणार नाही. तर या प्रकरणातल्या अधिकार्‍यांचीही जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई केली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली.

close