जातीय आरक्षणाला मनसेचा विरोध – राज ठाकरे

August 9, 2011 5:00 PM0 commentsViews: 12

09 ऑगस्ट

आरक्षण सिनेमा मी पाहिलेला नाही, पण पाहिल्यावरही आमचा या सिनेमाला विरोध नसेल असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. जातीनिहाय आरक्षण नको, तर आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण हवे अशी मनसेची भूमिका असल्याचंही राज ठाकरेंनी स्पष्ट केले. तसेच नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदासाठी लायक उमेदवार आहेत असंही राज ठाकरे म्हणाले.

आपला देश हा अठरा पगड जातीचा देश आहे. देशभरात अनेक जातीपातीचे लोक राहतात. पण गरीबांना आरक्षण दिलं पाहिजे मग तो कोणत्याही जाती धर्माचा असू द्या पण असे होत नाही. आपल्याकडे हा या जातीचा आहे तो त्या जातीचा आहे असं सगळं आपल्याकडे घडते. आपण एकीकडे म्हणतो, जातीपाती विसरूण एक झालं पाहिजे पण जातीपातीवरून वर्गीकरण करून आपणं पुढे चाललो आहे का ? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. तसेच आरक्षण सिनेमा मी पाहिलेला नाही त्यामुळे सिनेमाला विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही. गुजरात दौर्‍यावर असलेले राज ठाकरे पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच नरेंद्र मोदी यांच्या सारखे व्यक्ती पंतप्रधान होण्यास योग्य आहे. मी अनेक देशा विदेशात प्रवास केला आहे. त्या देशांच्या तुलनेत आपण खूप मागे राहिलो आहेत. असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं.

close