‘आरक्षण’ विरोधात औरंगाबाद, नाशकात निदर्शन

August 9, 2011 11:23 AM0 commentsViews: 3

09 ऑगस्ट

प्रकाश झा यांच्या आरक्षण चित्रपटाविरुध्द राज्यात निदर्शनं सुरुच आहे. आज औरंगाबाद इथं रिपाई आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटाविरुध्द निदर्शने केली. हा चित्रपट आरक्षण विरोधी असल्याचे सागत कार्यकर्त्यांनी औरंगपुरा इथं झा यांचा प्रतिकारात्मक पुतळा जाळला. हा चित्रपट रामदास आठवले यांना दाखवावा अशी मागणीही केली. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. तर दुसरीकडे नाशिकमध्येही समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आरक्षण चित्रपटाविरुध्द सिने मॅक्समध्ये निदर्शने केली. हा चित्रपट छगन भुजबळ यांना दाखवावा अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली.

close