लंडनमध्ये गोळीबारानंतर दंगल ; 300 जणांना अटक

August 9, 2011 3:22 PM0 commentsViews: 2

09 ऑगस्ट

उत्तर लंडनमधल्या टोट्टेनहॅम इथं शनिवारी रात्रीपासून दंगल भडकली आहे. त्यात 26 पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत. ही दंगल आता बकिंगहॅम आणि लिव्हरपूलपर्यंत जावून पोहोचली आहे. दंगलखोरांनी या परिसरात जोरदार जाळपोळ आणि लूटपाट सुरु केली. दंगलखोरांनी पोलिसांवरही हल्ले केले आहेत.

याप्रकरणी आतापर्यंत 300 जणांना अटक करण्यात आली आहे. दंगलीचा हा तिसरा दिवस आहे. अनेक वर्षानंतर लंडन शहराला एवढ्या भीषण दंगलीचा फटका बसला आहे. टोटेनहॅम परिसरात 29 वर्ष युवक पोलीस गोळीबारात ठार झाल्यानंतर ही दंगल उसळली होती. दरम्यान, बकिंगहॅम इथं टीम इंडियाची सुरक्षा वाढवण्यात आली. तिसर्‍या टेस्ट मॅचसाठी टिम इंडिया बकिंगहॅम येथील हॉटेलमध्ये थांबलेली आहे. खेळांडूना बाहेर न पडण्याचा सूचना देण्यात आल्या आहे.

close