शेतकर्‍यांना टार्गेट करुन गोळ्या घातल्या – खडसे

August 9, 2011 5:00 PM0 commentsViews: 49

09 ऑगस्ट

मावळ येथे झालेला गोळीबारात पोलिसांनी आंदोलकांना टार्गेट करुन गोळ्या घातल्या असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला. एकनाथ खडसे आणि आमदार नीलम गोर्‍हे यांनी जखमींची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. तसेच पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झालेल्याच्या कुटुंबीयांचीही या दोघांनी भेट घेतली. या सर्व घटनेला पुण्याचे पालकमंत्री अजित पवारच जबाबदार असल्याचा आरोप नीलम गोर्‍हे यांनी केला.

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर बऊर गावाजवळ शेतकर्‍यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांवर पोलिसांनी गोळीबार केला. यात तीन आंदोलक शेतकर्‍यांचा मृत्यू झाला. पवना धरणातून पिंपरी-चिंचवडसाठी पाण्याची पाइपलाईन टाकण्यात येत आहे. या पाइपलाईनला स्थानिक शेतकर्‍यांचा विरोध आहे. त्याविरोधात आज मावळ तालुक्यात ठिकठिकाणी सभा आणि रास्ता रोको करण्यात आले. पहाटेपासूनच या आंदोलनाला सुरुवात झाली. बऊर गावाजवळही रास्ता रोको करण्यात आला. दुपारी हे आंदोलन चिघळले आणि त्याला हिंसक वळण लागले.

close