मॅरेडोनाने दिली पद सोडण्याची धमकी

November 14, 2008 7:46 PM0 commentsViews: 3

14 नोव्हेंबरफूटबॉल खेळत असतानाही अर्जेंटिनाचा स्टार फूटबॉलपटू दिएगो मॅरेडोना वादग्रस्त म्हणूनच प्रसिद्ध होता.आणि आता निवृत्ती नंतरही नव नवे वाद त्याची पाठ सोडताना दिसत नाही. अर्जेंटिनाच्या फूटबॉल टीमचा कोच म्हणून त्याची नुकतीच नियुक्ती झाली. कोच म्हणून त्याच्या प्रशिक्षणाखाली अर्जेंटिना टीम एकही मॅच खेळलेली नाही. आणि त्यापूर्वीच मॅरेडोनाने हे पद सोडण्याची धमकी दिली आहे. अर्जेंटिनाचाच माजी डिफेन्डर ऑस्कर रुगरी हा मॅराडोनाला असिस्टंट कोच म्हणून हवा आहे. पण फूटबॉल असोसिएशन तशी परवानगी द्यायला तयार नाही. त्यामुळे आगामी स्कॉटलंड दौ-यात टीमबरोबर न जाण्याची धमकी मॅरेडोनानं दिली आहे. याच महिन्यात चार तारखेला मॅराडोनाची अर्जेंटिना टीमचा कोच म्हणून नियुक्ती झाली होती.

close