महापालिकेच्या सव्वा लाख कर्मचार्‍यांची संपाची हाक

August 9, 2011 12:06 PM0 commentsViews: 2

09 ऑगस्ट

मुंबई महापालिकेचे सव्वा लाख कर्मचारी आज रात्री 9 पासून संपावर जाण्याची शक्यता आहे. सहावा वेतन आयोग लागू व्हावा यासाठी गेले कित्येक दिवस कामगार मागणी करत आहे. पण हा वेतन आयोग लागू होण्यात दिरंगाई होत असल्याने शरद राव आणि इतर कामगार संघटनांनी संपाची हाक दिली.

यामुळे महापालिकेच्या सर्व सेवा ठप्प होऊ शकतात. आयुक्तांबरोबरची पहिली बैठक फिस्कटल्याने संपाच्या भुमिकेवर आपण ठाम राहणार असल्याचे कर्मचार्‍यांचे म्हणणं आहे. आता पुढची बैठक चार वाजल्यापासून सुरु झाली. तर या संपात सहभागी न होण्याचे आवाहने आयुक्त सुबोधकुमार यांनी केले आहे.

close