भारत – इंग्लंड तिसरी टेस्टवर दंगलीचे सावट

August 9, 2011 5:59 PM0 commentsViews: 7

09 ऑगस्ट

भारत आणि इंग्लंडदरम्यानची तिसरी टेस्ट मॅच बुधवारपासून सुरु होत आहे. बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन स्टेडियमवर ही मॅच खेळवली जाणार आहेत. पण या मॅचवर दंगलीचे सावट आहे. दोन दिवसांपूर्वी लंडनमध्ये सुरु झालेली दंगल आता बर्मिंगहॅम शहरात पोहोचली. सोमवारी रात्रीच 100 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

या टेस्टसाठी दोन्ही टीमचे खेळाडू बर्मिंगहॅममध्ये पोहोचले. सोमवारी रात्री भारतीय टीमचे काही सदस्य बाहेर जेवायला गेलेले असताना दंगलीची बातमी आली. खेळाडूंना सुरक्षितपणे हॉटेलमध्ये आणण्यात आले. पण आज दोन्ही टीमचे खेळाडू सरावासाठी मैदानात उतरले. अर्थात त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली. दरम्यान तिसरी टेस्ट नियोजित वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून सांगण्यात आले.

close