भुजबळांच्या सेन्सॉरशिपपुढे प्रकाश झांची माघार

August 10, 2011 7:00 PM0 commentsViews: 5

10 ऑगस्ट

आरक्षण सिनेमाबद्दलचं आपलं आंदोलन मागे घेत असल्याचे समता परिषदेचे संस्थापक छगन भुजबळांनी जाहीर केले. आरक्षण सिनेमाचे विशेष स्क्रीनिंग निर्माते प्रकाश झा यांनी भुजबळांसाठी काल मंगळवारी आयोजित केलं होतं. सिनेमा पाहिल्यानंतर काही दृष्यांवर आणि सिनेमात उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर भुजबळांनी आक्षेप घेतला होता.

तसेच त्या संदर्भात आज बैठकही बोलवली होती. या बैठकीनंतरच आंदोलन मागे घेत असल्याचे भुजबळांनी जाहीर केले. निर्माते प्रकाश झा यांनी काही आक्षेपार्ह दृष्ये वगळण्याबद्दल सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे भुजबळांनी सांगितले. त्यामुळेच याला असलेला विरोध आता राहणार नसून, त्याविरुद्धचे आंदोलन मागे घेत असल्याचंही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

close