संतोष हजारे ठरला मुंबई अपंग श्री चा मानकरी

November 14, 2008 7:46 PM0 commentsViews: 10

14 नोव्हेंबर मुंबईजिद्दीच्या जोरावर अपंगत्वावर मात करता येते हे मुंबईच्या संतोष हजारेनं दाखवून दिलंय. पोलियोमुळे एका पायानं अधू असलेल्या संतोषनं यंदाची मुंबई अपंग श्री बॉडी बिल्डिंग स्पर्धा जिंकली. सालम जिमच्या संतोष हजारेला सचिन गिरीकडून कडवी झुंज मिळाली. 55 किलोपेक्षा अधिक वजनीगटात संतोषनं आपल्या शरीरसौष्ठवानं उपस्थितांना थक्क केलं. मुंबई बॉडी बिल्डिंग असोसिएशनने या स्पर्धेचं आयोजन केलं होतं.

close