इंग्लंडमध्ये दंगलीचा वणवा पसरला

August 10, 2011 5:17 PM0 commentsViews: 3

10 ऑगस्ट

ब्रिटनमध्ये पाच दिवसांपासून उसळलेल्या दंगली आता देशातील अनेक भागात पसरल्या आहेत. लंडनमध्ये परिस्थिती काल चिंताजनक होती. पण 16 हजार पोलीस तैनात केल्यानंतर आणि 750 लोकांना ताब्यात घेतल्यानंतर. आज लंडन शांत होतं.

पण दंगलीच्या वणव्यात बर्मिंगहॅम, मँचेस्टर, सॅलफोर्ड, नॉटिंगहॅम, लिव्हरपूल आणि इतर अनेक शहरं धुमसत आहेत. इथं मोठ्या प्रमाणात तोडफोड आणि लुटालूट करण्याच्या घटना सुरू आहेत. पंतप्रधान डेव्हिड कॅमरॉन इटलीचा दौरा सोडून मायदेशी परतले असून त्यांनी तातडीने संसदेचं अधिवेशन बोलवले. पोलिसांच्या गोळीबारामुळे या दंगली उसळल्या असल्या. तरी या निमित्ताने ब्रिटनमधील आर्थिक संकट, बेरोजगारी, वांशिक मतभेद असे अनेक मुद्दे ऐरणीवर आले आहेत.

close