‘आरक्षण’मध्ये किरकोळ बदल करू – प्रकाश झा

August 10, 2011 1:54 PM0 commentsViews: 4

10 ऑगस्ट

राजकारणी त्यांच्या राजकीय फायद्यासाठी काही अजेंडा राबवत असतात. त्या अजेंडांचा कलाकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर परिणाम व्हायला नको तसेच समता परिषदेचे संस्थापक छगन भुजबळांनी आरक्षण चित्रपटात ज्या दृश्यांवर आक्षेप घेतले आहे. त्यात काही किरकोळ बदल करण्याचा विचार करू असं निर्माते प्रकाश झा यांनी सांगितले.

आरक्षण चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रकाश झा आणि अमिताभ बच्चन आज पुण्यामध्ये आरक्षण चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सिम्बायोसिस कॉलेज मध्ये आज आरक्षण ची टिम आली होती. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केलं. राजकारण्यांच्या प्रेशर पुढे झुकण्याशिवाय काही पर्यायच नसल्याचे मत निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश झा यांनी व्यक्त केलं आहे. मला माझा चित्रपट रिलीज करायचा आहे. त्यामुळे हायकोर्टाने कोणालाही चित्रपट दाखवायची गरज नाही असं सांगितलं असलं तरीही हा चित्रपट राजकारण्यांनी दाखवला असल्याचं त्यांनी सांगितलं.

भुजबळांनी चित्रपट पाहुन पॉझिटिव्ह प्रतिक्रिया दिल्याचंही त्यांनी सांगितलं. पण चित्रपटामध्ये भुजबळ यांच्या म्हणण्यानुसार बदल करणार आहे की नाही हे मात्र स्पष्ट केलं नाही. रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्याशीही चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

close