राज्य करायला सरकार नालायक – उद्धव ठाकरे

August 11, 2011 9:45 AM0 commentsViews: 1

11 ऑगस्ट

राज्य करायला हे सरकार नालायक आहे, असं म्हणत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राज सरकारवर हल्लाबोल केला. आज सकाळी उद्धव ठाकरेंनी मावळला भेट दिली. सकाळी सव्वा दहाच्या सुमारास बऊरजवळ एक्सप्रेस हायवेला भेट दिली. जिथे गोळीबार झाला ती जागा त्यांनी गाडीतून पाहिली. त्यानंतर येळसे गावात मृत शेतकरी कांताबाई ठाकर यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या मुलाचं सांत्वन केलं. आणि प्रत्यक्षदशीर्ंकडून गोळीबाराच्या दिवशी नेमकं काय झालं याची माहिती घेतली. त्यानंतर शिवणे गावात जाऊन मृत शेतकरी मोरेश्वर साठे याच्या घरी त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तळेगाव ग्रामीण रुग्णालयात जाऊन त्यांनी जखमींचीही विचारपूस केली.

close