टीम इंडिया 224 रन्सवर ऑलआऊट ; धोणीची एकाकी झुंज

August 10, 2011 4:21 PM0 commentsViews:

10 ऑगस्ट

एजबॅस्टन टेस्टच्या पहिल्या दिवशी भारतीय बॅटिंग पुन्हा एकदा फ्लॉप झाली. एकवेळ अशी होती की सात विकेट 111 रनवर गेल्या होत्या. पण धोणीच्या 77 रनच्या इनिंगमुळे भारताने निदान दोनशे रनचा टप्पा ओलांडला. त्यापूर्वी टॉप ऑर्डर आज पुन्हा गडबडली. सेहवाग पहिल्याच बॉलवर आऊट झाला.

तर गंभीरने 38, द्रविडने 22 रन केले. सचिनही फक्त एक रन करु शकला. त्यानंतर धोणीने तळाच्या प्रवीण कुमारच्या साथीने 84 रनची पार्टनरशिप केली. प्रवीण कुमारने 26 रन केले. भारतीय टीम अखेर 224 रनवर ऑलआऊट झाली. इंग्लंडतर्फे ब्रेसनन आणि स्टुअर्ट ब्रॉडने प्रत्येकी चार विकेट घेतल्या. इंग्लंडची बॅटिंग आता सुरु झाली आहे.

close