मावळ का पेटले ?

August 10, 2011 4:37 PM0 commentsViews: 1

10 ऑगस्ट

पवना धरणातून पिंपरी चिंचवडसाठी पाण्याची पाईपलाईन टाकण्यात येत आहे. या विरोधात शेतकर्‍यांनी आंदोलन केलं. शेतकर्‍यांच्या या आंदोलनावर पोलिसांनी गोळीबार केला या आंदोलनात 3 शेतकर्‍यांचा मृत्यू झाला. नेमकं हे आंदोलन का पेटले ? तिथला प्रश्न नेमका काय आहे. याबद्दल सांगणार हा रिपोर्ट..

पिंपरी चिंचवड महापालिकेला लागणारे पाणी आणण्यासाठी 2008 मध्ये केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरत्थान योजनेअंतर्गत योजना राबवण्यात आली. यासाठी लागणारे पाणी पवना धरणातून थेट जलवाहिनी टाकून आणण्याची ही योजना होती. खरं तर जेव्हा महापालिकेनं या योजनेची घोषणा केली अगदी तेव्हापासूनच स्थानिक शेतकर्‍यांचा त्याला विरोध होता.

कारण या योजनेत 15 गावातील 26.95 हेक्टर जमीन जाणार होती. आधीच वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी शेतकर्‍यांच्या मोठ्या प्रमाणात जमीनी गेल्या आहेत. त्यात ही नवी योजना त्यामुळे अल्पभूधारक शेतकरी देशोधडीला लागतील असं येथील शेतकर्‍यांचं म्हणणं होतं. शिवाय हे पाणी पिंपरी भागात वळवले तर येथील बागायती जमीनीला पाणी मिळणार नाही असंही त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळेच दिवसेंदिवस शेतकर्‍यांचा विरोध वाढत होता.

सगळे पक्षसुध्दा एक एक करत शेतकर्‍यांच्या या लढ्यात सामील झाले. फक्त त्याला अपवाद होती राष्ट्रवादी काँग्रेस. कारण ही योजना पुढे रेटण्यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारच आग्रही होते असं शेतकर्‍यांचं म्हणणं आहे. या योजनेला विरोध करण्यासाठीच मंगळवारी आंदोलन केलं गेलं. पोलिसांनी ते हाणून पाडण्याचा प्रयत्न केला आणि पवनेचं पाणी पेटलं. आपल्या हक्काचे पाणी आणि जमीन वाचवण्यासाठी तिघा जणांना आपला जीव गमवावा लागला.

close