औरंगाबादमधल्या मुलांचा प्रश्न खेळायचं कुठे

November 14, 2008 2:36 PM0 commentsViews: 5

14 नोव्हेंबर औरंगाबादबालपत्रकार नील रोकडे औरंगाबाद शहरातील श्रेयनगर येथली मैदानं आणि मोकळी जागा धोकायदायक बनत चालली आहेत. या ठिकाणी खेळणा-या मुलांना विहिरी आणि उघड्या इलेक्ट्रिक बोर्डमुळे नेहमीच धोका असतो. हा धोका कसा तो सांगतोय आमचा चाइल्ड सिटिझन जर्नलिस्ट निल रोकडेनिल सांगतो, घरातून खेळायला बाहेर पडलो की पहिला प्रश्न पडतो कुठे खेळायला जायचं. कारण शहरात खेळण्या लायक मैदानच शिल्लक नाहित. तसंच मोकळया जागेत, रस्त्याच्या बाजूला खेळावं तर तिथे कच-याचा ढीग असतो. या ठिकाणी खेळतांना त्रास होतो. माझ्यासारखे या भागातले अनेकजण आहेत.कितीही त्रास झाला तरीही इथेच खेळावं लागतं, करणार काय. खेळायला आम्हाला दुसरी जागाचं नाही. रस्त्यावर तर आम्ही खेळू शकत नाही. माझ्या बाजूला एका मित्राचं घर आहे. तिथे विहीर आहे खेळायला गेलो तर बॉल विहिरीत जातो. एका ठिकाणी जवळच उघडा इलेक्ट्रिक बोर्ड आहे. तिथे बॉल गेला की भीती वाटते. इतर ठिकाणी खेळताना कोणाच्या घरी बॉल गेला की बॉल परत मिळत नाही. एकतर खेळायला मैदानं नाहीत आणि जिथे मोकळी जागा आहे तिथे काहीना काही अडथळे आहेत. मग आम्ही खेळायचं कुठे ?

close