पोलीस दोषी आढळल्यास फौजदारी गुन्हा दाखल करणार – आर.आर.पाटील

August 11, 2011 10:19 AM0 commentsViews: 2

11 ऑगस्ट

मावळ गोळीबार प्रकरणाच्या चौकशीसाठी येत्या 8 दिवसात निवृत्त न्यायाधीश नियुक्ती करणार असल्याची घोषणा आर. आर. पाटील यांनी विधानपरिषदेत केली. या चौकशीमध्ये जर पोलीस दोषी आढळले तर त्यांच्याविरुध्द 302 खाली गुन्हा दाखल करणार असल्याचंही आर आर पाटील यांनी सांगितले.

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर बऊरजवळ शेतकर्‍यांच्या आंदोलनावर पोलिसांनी गोळीबार केला यामध्ये तीन शेतकर्‍यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची निवृत्त न्यायाधिशांमार्फत चौकशी करण्यात येईल अशी घोषणा काल आर.आर.पाटील यांनी केली होती. ही घोषणा करत असताना एक गौप्यस्फोटही पाटील यांनी केला.

शेतकर्‍यांच्या आंदोलनातून एका खाजगी गाडीतून पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला अशी तक्रार एका व्यक्तींने केली आहे. या फायरींगमध्ये नवनाथ पांगरे नावाची व्यक्ती जखमी झाली आहे. पोलिसांनी पांगारे यांची विचारपूस केली असता. मला गोळी लागली असली तरी ती कोठून आली याबाबत मला कसलीही माहिती नसल्याचा खुलासा पांगारे यांनी केला.त्यामुळे मावळच्या गोळीबार प्रकरणातील गुंता वाढत चालला आहे.

close