अफझल गुरुच्या दयेची याचिका रद्द करा !

August 10, 2011 6:03 PM0 commentsViews: 3

10 ऑगस्ट

2001 मधील संसद हल्ल्यामधील अतिरेकी अफझल गुरुची दयेची याचिका फेटाळावी अशी शिफारस केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्याकडे केली. दिल्लीच्या नायब राज्यपालांनी केलेल्या शिफारसींवर केंद्रीय गृहमंत्रालयाने शिक्कामोर्तब केल्याची माहिती सुत्रांनी दिली.

गृहमंत्रालयाने आपल्या शिफारसींसोबत 8 ते 10 पानांच्या नोट्सही जोडल्यात. त्यात ट्रायल कोर्ट, हाय कोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशांचा समावेश आहे. 13 डिसेंबर 2001 रोजी संसदेवर हल्ला झाला होता. त्याप्रकरणी जैश-ए-मोहम्मदचा अतिरेकी अफझल गुरुला दोषी धरत सुप्रीम कोर्टाने 2004 मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती.

पण, अफझल गुरूने त्यावेळचे राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्याकडे दयेसाठी अर्ज केला. आणि त्याच्या दयेच्या याचिकेला राजकीय वळण मिळाले. अफझल गुरुला फाशी झाली तर काश्मीरमध्ये हिंसाचार होईल अशी भीती व्यक्त करण्यात आली. राजकीय फायद्यासाठीच युपीए सरकारअफझल गुरुला फाशी देणं टाळतंय असा आरोप भाजपनं वारंवार केला. आता गृहमंत्रालयाने अफझल गुरुची दयेची याचिका फेटाळावी अशी शिफारस केल्यामुळे त्याच्या फाशीचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

close