तेल गळतीचा अलिबागला तडाखा

August 11, 2011 12:22 PM0 commentsViews: 19

11 ऑगस्ट

मुंबई समुद्रकिनार्‍याजवळ बुडालेल्या एम.व्ही.रॅक जहाजातील तेल तवंग रायगडच्या किनार्‍यापर्यंत पोहचले आहेत. तेल गळतीचा सर्वात जास्त तडाखा अलिबाग तालुक्याला बसला आहे. आवास आणि थळ समुद्रकिनार्‍यावर तेल तवंग वाहून येण्याचे प्रमाण अजूनही कमी झालेला नाही. हा तवंग काढण्याचे काम सुरु आहे.

यासाठी स्थानिक ग्रामपंचायतीची मदत घेतली जातं आहे. दरम्यान, एम व्ही रॅक जहाजाच्या कंपनी विरोधात जिल्हा प्रशासनाने फौजदारी कारवाईची नोटीस बजावली आहे. सार्वजनिक ठिकाणांचे नुकसान केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली.

कंपनीला तेल तवंग काढण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मच्छीमार आणि सार्वजनिक ठिकाणांचे झालेलं नुकसान लक्षात घेऊन कंपनीने नुकसान भरपाई द्यावी असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले. नुकसान भरपाई द्या नाहीतर, सीआरपीसी कायद्याच्या कलम 133 नुसार कारवाईला सामोरे जायला तयार रहा असा इशारा त्यांनी देण्यात आला आहे.

close