युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा बीएसएनएल कार्यालयात राडा

August 11, 2011 8:45 AM0 commentsViews: 2

11 ऑगस्ट

युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रत्नागिरीतल्या बीएसएनएल कार्यालयामध्ये अभियंत्याच्या केबिनमध्ये घुसून सामानाची तोडफोड केली. तसेच या अभियंत्याला कार्यलयाच्या बाहेरही काढले. बीएसएनएल च्या ओएफसी केबलच्या जागेत इतर मोबाईल कंपन्यांच्या केबल टाकण्याच्या प्रकरणात बीएसएनएल अधिकार्‍यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला.

बीएसएनएलच्या लेखी पत्रात इतर कंपन्यांच्या केबल असल्याचे मान्यही करण्यात आले. मात्र गेले अनेक दिवस याबाबत काहीच कारवाई होत नव्हती. बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिका-यांनी या संपूर्ण प्रकरणात गुप्तता बाळगली . त्यामुळे या कार्यकर्त्यांनी बीएसएनएलच्या ऑफिसवर धडक दिली. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन गुन्हे नोंद केले.

close