कोल्हापुरात भोसले नाट्यगृहाकडे वितरकांनी फिरवली पाठ

August 11, 2011 8:59 AM0 commentsViews: 4

11 ऑगस्ट

कोल्हापुरात केशवराव भोसले नाट्यगृहात अवाजवी भाडेवाढ केल्याने नाट्य निर्माते, नाट्य वितरक आणि नाट्यप्रेमीतून संताप व्यक्त केला जातं आहे. सध्या नाट्यगृहाच्या भाड्यासह एसी आणि विजेचे बिल धरुन एका प्रयोगासाठी अकरा हजार रुपये नाट्य वितरकांना द्यावे लागत आहेत. महाराष्ट्रातल्या कोणत्याही नाट्यगृहापेक्षा हे भाडं दुप्पटीने जास्त आहे. या नाट्यगृहाची तिकीट खिडकी गळणारी आहे. जनरेटरची सोय नाही,नाट्यगृहाला एअर टाईट दारे नाहीत,स्पॉट,सेटिंग आणि लेव्हलचीही सोय नाही. तरीही नाट्यवितरकांना अवाजवी भाडे द्यावे लागत असल्याने अनेक नाट्य वितरकांनी पाठ फिरवली आहे.

close