महागाईला कंटाळून एकाची आत्महत्या

August 11, 2011 3:21 PM0 commentsViews: 1

11 ऑगस्ट

ठाण्यातील सावरकर नगर येथे राहणारे 62 वर्षीय भीमराव भंडारे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आपण वाढत्या महागाईला कंटाळून हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आणि माझ्या या आत्महत्येला सरकार जबाबदार असल्याचंही त्यांनी या चिठ्ठीत नमुद केल्यामुळे एकच खळबळ उडाली. वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिक हवालदिल झालेत आणि हे सरकार आणखी किती बळी घेणार आहे असा सवाल मृताचे नातेवाईक करत आहेत. या घटनेचे पडसाद विधानभवनातही उमटले. विरोधकांनी याचा तीव्र निषेध केला.

close