परप्रांतीयांना हटवणे पहिला उद्देश नाही – राज ठाकरे

August 11, 2011 5:40 PM0 commentsViews: 11

11 ऑगस्ट

परप्रांतीयांना हटवणे हा आपला पहिला अजेंडा नाही, महाराष्ट्राची प्रगती हे आपले पहिले ध्येय आहे पण परप्रांतीयांच्या लोंढ्यांमुळे काय समस्या निर्माण होतात हे महाराष्ट्रात येऊन पहा असं राज ठाकरे यांनी म्हटले आहे. राज ठाकरेंचा बहुचर्चित गुजरात दौरा आज संपला आहे. पण आपण गुजरातचा पुन्हा दौरा करणार असल्याचंही त्यांनी सांगितले.

राज ठाकरे यांनी गुजरात दौर्‍याला सुरूवात केली ती साबरमती आश्रमापासून. महात्मा गांधी यांच्याकडून नेहमी प्रेरणा मिळते असं म्हणत राज ठाकरे यांनी सुरू केलेला आपला दौरा आज संपवला. 'मी मुंबईकर' असं म्हणणारे राज ठाकरे दौर्‍याच्या पहिल्या दिवशी चक्क हिंदीत बोलून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

राज यांच्या हिंदीतून बोलण्यावरून विरोधक ही गोंधळून गेले. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी राज यांचा दौरा हा राजकीय स्टंट आहे अशी टीका ही केली. तर कृपाशकंर सिंग यांनी तर राज हिंदीतून बोलेले हे बरं झालं ते बोलले अशी उपहासात्मक टीका केली. पण आपला हा दौरा राजकीय हेतू, भाषा, धर्म यासाठी मुळीच नाही असं स्पष्ट शब्दात राज यांनी ठणकावून सांगितले.या दौर्‍यांच्या काळात येथील अनेक प्रकल्पांना त्यांनी भेटी दिल्या.

प्रत्येक प्रकल्प पाहून राज ठाकरे भारावून गेले होते. नॅनो प्रकल्पाला भेट दिली असता नॅनो सारखा प्रकल्प आपल्या राज्यात नाही यांची खंत ही व्यक्त केली. गुजरात राज्याचा विकास होऊ शकला तो मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे. एव्हानं राज यांनी मोदी हे राज्याचे विश्वस्त आहे असा बहूमानच देऊ केला. आज आपल्या दौर्‍याच्या शेवटच्या दिवशी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली.

राज यांच्या दौर्‍याबद्दल पत्रकारांनी प्रश्नाची चांगली सरबती केली. स्पष्ट आणि रोखठोक बोलणारे राज ठाकरे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तर दिली. राज यांना परप्रांतीयांना हटवणे असा आपला अजेंडा आहे का असा सवाल केला असता, राज म्हणाले की, परप्रांतीयांना हटवणे हा आपला अजेंडा नाही. त्यांच्यामुळे काय समस्या झाल्या आहे हे आपण महाराष्ट्रात येऊन पाहावे यांचे मी आपल्याला निमंत्रण सुध्दा देतो.

राज्य सुरूळीत चालावे हीच आपली अपेक्षा आहे. राज्य,शहरे हे वाढती लोकसंख्या किती सहन करू शकता यांचीही एक मर्यादा असते. पण जर बाहेरून येणारे लोंढे जर वाढत असेल तर शहरातील लोकांना त्रास होणारच जर हे वेळीच रोखलं नाही तर भविष्यात ही समस्या मोठी होऊ शकते. आता या वाढत्या लोकसंख्येमुळे पाणी, नोकरी याच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहे. आणि हे मीच म्हणतं नाही तर शीला दीक्षित, पी चिदंबरम यांनी देखील दिल्लीबद्दल म्हटलं आहे. याच समस्या त्यांनी तिथे होत आहे. आसाममध्ये सुध्दा हे होत आहे. पण महाराष्ट्रात असं काही झालं नाही. तरी सुध्दा राज ठाकरे यांनाच हा प्रश्न विचारला जातो असा सवाल ही राज ठाकरे यांनी उपस्थित केला. मी आपल्या निमंत्रण देतो की आपणही महाराष्ट्रात यावे आणि तिथली परिस्थिती पाहवी. असं निमंत्रण राज यांनी गुजरातच्या पत्रकारांना दिला.

close