कोट्यावधीचा कर बुडवणार्‍या हसन अलीला जामीन

August 12, 2011 12:25 PM0 commentsViews: 2

12 ऑगस्ट

कोट्यावधीचा कर बुडवणारा घोडेव्यापारी हसन अलीला मुंबई हायकोर्टाने आज जामीन दिला. कर चुकवेगिरी आणि परदेशी बँकांमध्ये काळा पैसा जमा करण्याच्या आरोपावरुन हसन अलीला अटक करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर अलीला मार्च महिन्यात अटक करण्यात आली होती. इन्फोर्समेंट डिरेक्टोरेट म्हणजेच ईडी यासंदर्भातील तपास करतं आहे. अलीने हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर आज सुनावणी झाली. आणि 5 लाख रुपयांच्या जामीनावर कोर्टाने हसन अलीची सुटका केली. सुनावणीदरम्यान अलीला कोर्टरुममध्येच चक्करही आली होती.

close