राज्यातल्या हजारो धरणांची कामं रखडली

November 15, 2008 5:44 AM0 commentsViews: 2

15 नोव्हेंबर, मुंबईशोएब अहमदमहाराष्ट्र राज्य सध्या कर्जाच्या खाईत अडकत चाललंय. त्यातच लोडशेडिंगचं प्रमाणही वाढतंय. अशातच आता आणखी एका समस्येचा सामना करावा लागणार आहे. तो म्हणजे धरणांच्या प्रलंबित प्रश्नाचा. राज्यात अजूनही हजारो धरणांचं काम रखडलंय. माहितीच्या अधिकाराखाली आयबीएन लोकमतनं ही माहिती उघड केली आहे. रायगड जिल्ह्यात राहणार्‍या जनार्दन म्हात्रेचं स्वप्न होतं की, हेटवणे धरणाच्या पाण्याचा वापर करून उत्तम शेती करायची, पण 28 वर्षांनंतर अजूनही त्यांचं हे स्वप्न सत्यात उतरलं नाही. ' 1981 मध्ये या धरणाचं बांधकाम सुरू झालं. 1990 पर्यंत या धरणाचं काम पूर्ण होणार होतं. आज 27 वर्ष झाली, पण आम्हाला अजून शेतीला तर सोडाच, प्यायला देखील पाणी मिळालेलं नाही. ' असं जनार्दन म्हात्रे या शेतकर्‍यानं सांगितलं.रायगडमधली 22 गावं हेटवणे धरणाच्या पाण्याची वाट पहात आहेत. महाराष्ट्रताल्या 1000 पेक्षा जास्त धरणांची काही ना काही कामं अजूनही रखडली आहेत. माहितीच्या अधिकाराखाली आयबीएन लोकमतनं धरणांच्या रखडलेल्या कामाची माहिती उघड केली. महाराष्ट्रात अजूनही 1300 धरणांची कामं रखडली आहेत. त्यात 75 मोठे प्रकल्प आहेत. तसंच 181 मध्यम पाटबंधारे प्रकल्प आहेत. याबरोबरच 1125 लघुपाटबंधारे प्रकल्पही रखडले आहेत. ही सर्व धरणं बांधण्यासाठी 47 हजार 603 कोटी रुपये खर्च येणार आहे.ही सर्व कामं पूर्ण करण्यासाठी लोडशेडिंग सारखं संकट येत असल्याची कबुली मुख्यमंत्र्यांनीही दिली आह. सरकारच्या या नेहमीच्याच उत्तरांनी शेतकरी मात्र संतापले आहेत. सरकारच्या दिरंगाईची किंमत येत्या निवडणुकीत चुकवावी लागेल, असा इशारा रायगडमधले शेतकरी देत आहेत.

close