मावळ गोळीबार प्रकरणी 2 पोलीस अधिकारी निलंबित

August 12, 2011 5:41 PM0 commentsViews: 6

12 ऑगस्ट

मावळ गोळीबार प्रकरणी दोन पोलीस अधिकार्‍यांना निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा आर. आर. पाटील यांनी विधानपरिषदेत केली . पी. आय. अशोक पाटील आणि पीएसआय गणेश माने यांना या प्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. काल गुरूवारी वाहनाची तोडफोड करणार्‍या 6 पोलिसांनी निलंबित करण्यात आले आहे.

या पोलीस कर्मचार्‍यांवर वाहनांची तोडफोड करण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली अशी माहिती पुणे ग्रामीणचे एस.पी. संदीप कर्णिक यांनी दिली. मुंबई पुणे हायवेवर बऊरगावाजवळ पवना धरणातून बंदिस्त पाईपलाईन टाकण्यास विरोध करणार्‍या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला 9 ऑगस्टला हिंसक वळण लागलं होतं. यावेळी झालेल्या हिंसाचारात पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आणि गाड्यांची तोडफोड केली होती.

आता ही तोडफोड करणार्‍या सहा पोलिसांनी निलंबित करण्यात आले आहे. आयबीएन लोकमतने त्याच दिवशी पोलिसांनी कशाप्रकारे तोडफोड केली होती हे दाखवले होते. त्यानंतर या पोलिसांवर कारवाई झाली. तर पाच आंदोलकांना अटक करण्यात आली. मारूती गरदाळे, रवी गरदाळे, शेखर दळवी, नितिन दळवी आणि किरण वाघमारे या पाच आंदोलकांना अटक केली आहे. तर आज गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी दोन अधिकार्‍यांना निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा केली.

close