कडकोट बंदोबस्तात ‘आरक्षण’ रिलीज

August 12, 2011 12:43 PM0 commentsViews: 3

12 ऑगस्ट

वादच्या भोवर्‍यात अडकलेला प्रकाश झा यांचा आरक्षण सिनेमा आज रिलीज झाला. सकाळच्या प्रयोगाला अनेक ठिकाणी प्रेक्षक आले नाहीत. त्यामुळे काही थिएटरमध्ये सकाळचा प्रयोगाला रद्द करण्यात आला. तर दुपारीही सिनेमाला फारसी गर्दी नव्हती.

आरक्षणाच्या मुद्द्यावरून यात आक्षेपार्ह दृष्य आणि संवाद असल्याचे सांगत या सिनेमाला राजकीय नेत्यांनी विरोध केला. समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ आणि रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी सिनेमाला कडाडून विरोध केला. अखेर प्रकाश झा यांनी भुजबळ यांच्यासाठी खास स्क्रींनिग करून सिनेमा दाखवला.

यानंतर भुजबळ यांनी काही दृश्यांवर आक्षेप घेतला होता. भुजबळांच्या सुचना मान्य करत झा यांनी आक्षेपार्ह दृश्य काढण्यास मान्य केलं. आणि आज राज्यभरात आरक्षण रिलीज झाला. काही ठिकाणी शुकशुकाट होता. तर काही ठिकाणी आंदोलकांच्या राडा होईल अशी शक्यता म्हणून प्रेक्षकांनी मात्र नंतर पाहू असा पवित्रा घेतला. तर ठाण्यात बहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मल्हार टॉकिजजवळ निदर्शनं केली. आमच्या नेत्यांना चित्रपट दाखवा अशी मागणी करत बसपाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. या कार्यकर्त्यांनी घोषणा देत चित्रपटाचे पोस्टर्स फाडले. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

close