रायगडच्या किनार्‍यावर डॉल्फिन मासा मृतावस्थेत आढळला

August 12, 2011 10:36 AM0 commentsViews: 26

12 ऑगस्ट

रायगड जिल्हयात आवास समुद्र किनार्‍यावर एक भला मोठा डॉल्फिन मासा मृतावस्थेत आढळून आला आहेत. 22 फूट लांब असलेला डॉल्फिन मासा किनार्‍यावर वाहुन आला. एम व्ही रॅकमधील तेल गळतीमुळे या माशाचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जातं आहे.

गेल्या पाच ते सहा दिवसांपासुन आवास समुद्र किनार्‍यावर तेल तवंग वाहून येत होता.आता डॉल्फिन मासाच मृतावस्थेत वाहुन आल्याने लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालं आहे. कोकणातील मासेमारीवर या तेल गळतीचे दुष्परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान स्थानिक लोकांच्या मदतीने या माश्याला एका खड्यात पुरण्यात आले.

close