खाजगी विद्यापीठ विधेयकाच्या विरोधात निदर्शन

August 12, 2011 2:51 PM0 commentsViews: 1

12 ऑगस्ट

खाजगी विद्यापीठ विधेयकाच्या विरोधात नाशिकमध्ये छात्रभारती संस्थेच्या वतीने निदर्शनं करण्यात आली. शिक्षणाचा हक्क आणि आरक्षणासारख्या सुविधा यात डावलण्यात आल्याचा यावेळी निषेध करण्यात आला. उच्चतंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे यावेळी दहन करण्यात आले आणि विधेयकाची होळीही करण्यात आली. निधर्मी म्हणवणार्‍या या सरकारने आरक्षणासारख्या महत्त्वाच्या मुद्यांना तिलांजली देणार्‍या या स्वयंसहाय्य विद्यापीठ विधेयकाची गरजच काय असा सवाल केला जात आहे. त्याचबरोबर घाईघाईन विधेयक मंजूर करण्याबद्दलही विचारणा होती.

close