खुनी सरकार बरखास्त करण्याची राज्यपालांकडे मागणी

August 12, 2011 11:21 AM0 commentsViews: 5

12 ऑगस्ट

मावळ गोळीबार प्रकरणासंदर्भात राज्यातील सर्व विरोधकांनी राज्यपाल के. शंकरनारायणन यांची भेट घेतली. राज्य सरकार तातडीने बरखास्त करण्याची मागणी या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली. या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याचे आश्वासन राज्यपालांनी या शिष्टमंडळाला दिले. त्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही राजभवनावर जाऊन राज्यापालांची भेट घेतली.

या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेऊ असं आश्वासन राज्यपालांनी आश्वासन दिल्याची विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी माहिती दिली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक नाही. जैतापूर ते मावळ आंदोलकांवर गोळीबार सुरु आहे. निष्पाप लोकांवर सातत्याने राज्यात गोळीबार सुरु आहे असेही शिष्टमंडळाने राज्यपालांना दिलेल्या निवेदनात सांगितले आहे. या शिष्टमंडळात शेतकरी कामगार पक्षाच्या मिनाक्षी पाटील, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, मनसेचे गटनेते नितिन सरदेसाई आणि सर्व विरोधी पक्षाचे आमदार यांचा यामध्ये समावेश होता.

close