पुणे ढोलचा आवाज घुमला अण्णांच्या पाठिंब्यासाठी

August 12, 2011 3:08 PM0 commentsViews: 2

12 ऑगस्ट

अण्णा हजारे यांच्या उपोषणाला आज पुण्यात अनोख्या पद्धतीनं पाठिंबा देण्यात आला. ढोल ताशा ही पुण्याच्या गणेशोत्सवाची ओळख. याच ढोल ताशाचं वादन करुन तरुणाईने अण्णांना पाठिंबा व्यक्त केला. वंदेमातरम संघटनेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. एस पी कॉलेज मध्ये ढोल ताशा वाजवून तरुणांनी अण्णांना पाठिंबा देणार्‍या घोषणा दिल्या. लोकपाल आणि जनलोकपाल यातला नेमका फरक काय हे सांगण्यासाठी यावेळी पत्रकं वाटण्यात आली. यापुढे अनेक कॉलेजमधून अशाच पद्धतीने जनजागृती केली जाणार आहे.

close