छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यातलं मतदान पूर्ण

November 15, 2008 5:51 AM0 commentsViews: 4

15 नोव्हेंबर, छत्तीसगडछत्तीसगढ विधानसभेच्या 39 जागांसाठी 14 नोव्हेंबरला मतदान झालं. यापैकी बस्तर भागात नक्षलवाद्यांनी मोठ्या प्रमाणावर हिंसाचार घडवला. त्यामुळे काही ठिकाणी मतदान थांबवावं लागलं. छत्तीसगढमध्ये झालेल्या मतदानात नक्षलग्रस्त विभागात साधारण 27 ते 31 टक्के इतकं मतदान झाल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं. तर, बाकी भागात पन्नास टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय. गोरखा या बस्तरमधील एका विभागात नक्षलवाद्यांनी दारूच्या सुरूंगाचा स्फोट घडवून आणला त्यात एकूण तीन जण जखमी झाले. त्याचवेळेला दांतेवाडा या छत्तीसगढमधील दक्षिणेकडच्या जिल्ह्यात गोळीबारही करण्यात आला. याच जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी 3 ठिकाणी इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिन्स पळवली. त्यामुळे या भागातलं मतदान थांबवण्यात आलं. सुकमा आणि बीजापूर भागात मोठ्या प्रमाणावर पोलिस आणि नक्षलवाद्यांत चकमक उडाली. काल दुपारच्या दरम्यान कुंडा या भागातही व्होटींग मशिन पळवण्याचे प्रकार घडले. सुरक्षा व्यवस्थेतल्या गलथापणाबद्दल 24 पोलिसांना निलंबित करण्यात आलंय. यामध्ये 2 जण सब इन्स्पेक्टर आहेत तर, उरलेले कॉन्स्टेबल आहेत. पहिल्या टप्प्यात झालेल्या महत्त्वाच्या लढतींमध्ये मुख्यमंत्री रमणसिंग यांच्या मतदारसंघाचा समावेश आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसकडून उदय मुदलियार हे कॉंग्रेसचे नेते उभे होते. छत्तीसगढ विधानसभेचे सभापती प्रेमप्रकाश पांडे यांच्या मतदारसंघातही काल मतदान झालं. भिलाईनगर या त्यांच्या मतदारसंघात त्यांच्याविरोधात कॉंग्रेसचे बद्रुद्दीन कुरेशी उभे ठाकले होते. राज्याचे विरोधी पक्षनेते महेंद्र कर्मा यांच्या दांतेवाडा मतदारसंघातही मतदान झालं. याच भागात नक्षलवाद्यांनी निवडणूक रोखण्याचे प्रयत्न केले होते. भाजपचे भीमराज संडावी हे या मतदारसंघातले दुसरे प्रमुख उमेदवार होते.

close