अण्णा हजारे,बाबा रामदेव यांची राखी बाजारात

August 12, 2011 3:35 PM0 commentsViews: 5

12 ऑगस्ट

जनलोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे यांचे 16 ऑगस्टला उपोषण होत आहे. देशभरातून अण्णांना पाठिंबा देण्यासाठी लोक पुढाकार घेत आहे. नागपूरमध्ये एका राखी विक्रेत्याने चक्क रामदेव बाबा,अण्णा हजारे,मेधा पाटकर यांची चित्र असेलल्या राख्या बनवल्यात आहेत.

आपला समाज भ्रष्टाचार मुक्त व्हावा असा हेतू या मागचा आहे. रक्षाबंधन म्हणजे बहिण भावाच्या अतूट प्रेमाचा हा सण असून बहिणी भावास राखी बांधतात व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. रक्षाबंधन हे आपल्या व इतरांच्या जीवनामध्ये पवित्रता व मांगल्य निर्माण करण्याचे बंधन आहे. या पवित्र नात्यात बहिणीने भावाला अण्णा हजारे, बाबा रामदेव, मेधा पाटकर यांच्या फोटोची राखी बांधून समाजाचे भ्रष्टाचारापासुन रक्षण करावे असे वचन बहिणीला देईल अशी आशा या विक्रेत्याने आयबीएन लोकमतकडे व्यक्त केली.

close