मोरेश्वर साठेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करा – मुंडे

August 12, 2011 4:03 PM0 commentsViews:

12 ऑगस्ट

मावळ येथे झालेल्या गोळीबार प्रकरणानंतर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी भेट दिली होती. आज भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी आज मावळला भेट दिली. मोरेश्वर साठेंना पोलिसांनीच मारले असा थेट आरोप करत साठेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करा अशी मागणी त्यांनी केली. आणि लोकसभेत हा प्रश्न पुन्हा उपस्थित करणार असल्याचं त्यांनी म्हटले आहे. त्याआधी गोळीबारात ठार झालेल्या शांताराम तुपे यांच्या कुटुंबीयांच्या घरीही ते गेले.शांताराम तुपेंच्या मृत्यूनंतर या घराचा कर्ता व्यक्ती गेल्याने हे कुटुंब आर्थिक संकटात सापडले. तुपे यांच्या 2 वर्षाच्या मुलाच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारीही मुंडेंनी घेतली.

close