अण्णांचं सरकारला सडेतोड उत्तर

August 14, 2011 2:41 PM0 commentsViews: 5

14 ऑगस्ट

अण्णा हजारे यांच्यावर सरकारने केलेल्या सगळ्या आरोपांना अण्णांनी सडेताडे उत्तर दिलंय. माझ्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करावी आणि माझ्यावर एफआयआर दाखल करावा. तसंच 100 रुपयांचा भ्रष्टाचार केला हे सिद्ध करावं असं थेट आव्हान आज अण्णांनी सरकारला दिलंय. त्याचबरोबर सरकारनं कितीही आरोप केले, अडथळे आणले तरी आपण मागे हटणार नाही असंही अण्णांनी स्पष्ट केलंय. तर 16 ऑगस्ट पासून सुरु होणारं आंदोलन अहिंसक मार्गानेच लढावं असं देशवासीयांना अण्णांनी आवाहन केलंय.

अण्णा हजारेंच्या आंदोलनाला आता देशभरातून पाठिंबा वाढतोय आणि पोलिसांच्या जाचक अटी मान्य न करण्याचा निर्धार टीम अण्णानं केला. पण आता सरकारनं अण्णांचं आंदोलन निष्प्रभ करण्याचे प्रयत्न सुरू केलेत. अण्णांवर भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर आता टीम अण्णा प्रसिध्दीसाठी आंदोलन करत असल्याचा आरोप कपिल सिब्बल आणि अंबिका सोनी यांनी केलाय. आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण आंदोलनाची जागा ठरवण्याचा अधिकार तुम्हाला नाही अशा शब्दात कपिल सिब्बल यांनी हे आंदोलन दडपण्याची भाषा केली.

close