ज्येष्ठ अभिनेते शम्मी कपूर यांचं निधन

August 14, 2011 8:49 AM0 commentsViews: 7

14 ऑगस्ट

ज्येष्ठ अभिनेते शम्मी कपूर यांचं रविवारी निधन झालं. ते 79 वर्षाचे होते. मुंबईतल्या ब्रिच कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालं. गेल्या शनिवारी त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमीट करण्यात आलं होतं. ते किडनीच्या आजारांन त्रस्त होते. त्यांचं पार्थिव मलबार हिल इथल्या त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलंय. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी अंत्यसंस्कार होणार आहेत. बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासह बॉलिवूडमधल्या अनेक दिग्गजांनी त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं.

close