अण्णांच्या उपोषणाला परवानगी नाकारली

August 15, 2011 9:36 AM0 commentsViews: 3

15 ऑगस्ट

जयप्रकाश नारायण पार्कमध्ये उपोषण करण्यास दिल्ली पोलिसांनी अखेर परवानगी नाकारली. पोलिसांनी मागितलेलं हमीपत्र आज नागरी समितीने दिल्ली पोलिसांना सादर केले.

पण यात आंदोलन काळाचे बंधन आणि समर्थकांच्या संख्येवर घालण्यात आलेली मर्यादा समितीने अमान्य केल्याने समितीचे हमीपत्र पोलिसांनी नाकारले. त्यामुळे उद्या अण्णा जेपी पार्क इथं उपोषणाला बसले तर त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.

नागरी समितीकडून जोपर्यंत हमीपत्र मिळणार नाही तोपर्यंत परवानगी मिळणार नाही असं दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले. मात्र यामध्ये 2 महत्त्वाच्या अटी मान्य करण्यात येणार नाहीत.

आंदोलन काळाचे बंधन आणि समर्थकांच्या संख्येवर घालण्यात आलेली मर्यादा अण्णांनी अमान्य केली. सोबतच या ठिकाणी जायचा प्रयत्न केल्यास दिल्ली पोलीस अण्णांच्या सर्मथकांना अटक करण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. सध्या जे पी पार्क परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून या पार्कला कुलुप ठोकण्यात आले.

उपोषणासाठी अटी

-18 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जागा रिकामी करावी- जेपी पार्कमधल्या सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होणार नाही याची काळजी आयोजकांनीच घ्यावी- 4 ते 5 हजारांपेक्षा जास्त लोक उपोषणाच्या ठिकाणी असू नये. आंदोलनकर्ते शिस्तीत वागतील, याचीही काळजी आयोजकांनी घ्यायची. ते रस्त्यावर फिरणार नाहीत, याची जबाबदारी – उपोषण करणार्‍या व्यक्तींची सरकारी डॉक्टर्स दिवसातून 3 वेळा तपासणी करतील – डॉक्टर्सनी शिफारस केल्यास उपोषणकर्त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येईल- उपोषणाच्या परिसरात फक्त 50 कार्स आणि 50 टू व्हीलर्सना परवानगी – वाहतुकीची कोंडी होणार नाही, याची काळजी आयोजकांनी घ्यावी- आंदोलनादरम्यान प्रक्षोभक भाषण करू नये- ़डीसीपींच्या विशेष परवानगीशिवाय लाऊडस्पीकरचा वापर करता येणार नाही – लाऊडस्पीकरचा वापर फक्त सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंतच वापर करता येईल – काठ्या, तलवारी यासारख्या वस्तू आंदोलनाच्या ठिकाणी आणू नयेत

close