अण्णांवर टीका टाळा हायकंमाडाचा आपल्याच नेत्यांना दम

August 15, 2011 10:00 AM0 commentsViews: 2

15 ऑगस्ट

अण्णा हजारेंवर बेफाम आरोप करत सुटलेल्या आपल्याच मंत्र्यांना आवरण्याची वेळ काँग्रेसवर आली आहे. अण्णा हजारेंवर व्यक्तिगत टीका करण्याचे टाळा असं सांगत, काँग्रेस हायकमांडने मनीष तिवारी, कपिल सिब्बल आणि अंबिका सोनी यांना समज दिल्याचंही समजते. पंतप्रधान आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीत बैठकीत हा निर्णय झाला. आपल्या वक्तव्यावरून काँग्रेस विरुध्द अण्णा असं चित्र जनतेसमोर जाता कामा नये अशा सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अण्णांवर शिंतोडे उडवले तर डाग आपल्याच कपड्यांवर पडणार हे उमगल्याने काँग्रेसला उपरती झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.

close