पंतप्रधान खोटारडे आहे – केजरीवाल

August 15, 2011 11:17 AM0 commentsViews: 1

15 ऑगस्ट

अण्णांना जयप्रकाश नारायण पार्कमध्ये उपोषणासाठी दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर नागरी समिती आता आक्रमक झाली. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान देशाच्या जनतेशी खोटं बोलल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला. केजरीवाल यांनी नवी दिल्लीत आज सकाळी रॅली काढली.

भ्रष्टाचाराविरोधात पंतप्रधान काहीतरी ठोस उपाय करतील अशी आमची अपेक्षा होती असं केजरीवाल यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं. मला लोकपाल विधेयक हवं आहे असं पंतप्रधान म्हणतात. पण माझ्याकडे जादुची कांडी नाही असं लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांनी देशाला सांगत खोटारडेपणा केला असा थेट हल्लाबोल अरविंद केजरीवाल यांनी केला. अण्णा किंवा त्यांच्या सहकार्‍यांना अटक झाली तरी आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. कोणतीही घटनाबाह्य अट आम्ही मान्य करणार नाही असंही अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले.

close