अण्णांचे ‘राजघाट’वर चिंतन

August 15, 2011 11:31 AM0 commentsViews: 3

15 ऑगस्ट

उद्याच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे आजच राजघाटवर पोहोचले आहे. राजघाटावर अण्णांनी महात्मा गांधीच्या समाधीचं दर्शन घेतलं. तिथे त्यांनी चिंतन केलं. मागच्या आंदोलनाच्या वेळेसही अण्णांनी राजघाटावर जाऊन समाधीचं दर्शन घेतलं होतं. राजघाटानंतर अण्णा कॉन्स्टीट्युशनल क्लबमध्ये जाणार आहेत. अण्णांनी दोन पानांचा संदेश तयार केला आहे.अण्णा तिथे जाऊन लोकांना आवाहन करणार आहेत. आपल्या भूमिकेवर मात्र अण्णा ठाम आहेत.अण्णा उद्या राजघाटावर जाणार होते. पण त्यांनी आजच राजघाटावर जाण्याचा निर्णय घेतल्याने चर्चा सुरू झाली.

दरम्यान, अण्णा हजारे यांच्या उपोषणाला जयप्रकाश नारायण पार्कमध्ये करण्यास दिल्ली पोलिसांनी अखेर परवानगी नाकारली. पोलिसांनी मागितलेलं हमीपत्र आज नागरी समितीने दिल्ली पोलिसांना सादर केले. पण यात आंदोलन काळाचे बंधन आणि समर्थकांच्या संख्येवर घालण्यात आलेली मर्यादा समितीने अमान्य केल्याने समितीचे हमीपत्र पोलिसांनी नाकारले. त्यामुळे उद्या अण्णा जेपी पार्क इथं उपोषणाला बसले तर त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.

close