मिशन ‘पवित’ फत्ते

August 15, 2011 12:06 PM0 commentsViews: 3

15 ऑगस्ट

जुहू किनार्‍यावर रुतून बसलेल्या एम.टी.पवित या जहाजाला समुद्रात ओढायला अखेर कोस्टगार्डला यश आले आहे. ग्रेट ऑफ शोर या कंपनीतर्फे दोन टग बोटीच्या सहाय्याने जहाज खेचण्याची मोहीम राबवण्यात आली.आज साडेचार मीटरची भरती आली त्यात कोस्टगार्ड आणि ग्रेट ऑफ शोर यांच्या मोहिमेला यश येत अखेर एम.टी.पवितला समुद्रात खेचण्यात आले. मागील 15 दिवसापासून हे जहाज जुहू किनार्‍यावर रुतून बसले होते. काल दुपारीही चार फूटाची भरती होती. तेव्हा सुद्धा हे जहाज खेचण्याचे प्रयत्न कोस्टगार्डनं केला. पण काल त्यांना यात यश आलं नाही. मात्र आज हे जहाज ओढण्याचे यश मिळाले.

close