केजरीवाल, किरण बेदी यांनाही अटक

August 16, 2011 6:54 AM0 commentsViews: 2

16 ऑगस्ट

अण्णांचे आंदोलन होण्याअगोदरच पोलिसांनी कारवाई करत अण्णांना अटक केली. अण्णांना अटक करत अरविंद केजरीवाल, किरण बेदी यांना ही अटक करण्यात आली आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय, असं केजरीवाल सांगत होते. पण त्यांचंही पोलिसांनी ऐकलं नाही आणि त्यांना शेवटी पोलिसांनी ताब्यात घेतले.

काल सोमवारी अण्णांच्या आंदोलनला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. उपोषणासाठी 22 अटी अण्णांवर लादण्यात आल्या होत्या. मात्र यातील काही अटी अण्णांना मान्य नव्हत्या यामुळे पोलिसांनी हमी पत्र दिले नाही. पोलिसांनी परवानगी नाकारत आंदोलन केल्यास कारवाई करू असा इशारा दिला होता. आज सकाळपासूनच पोलिसांची कारवाई सुरु झाली होती. समर्थक , कार्यकर्ते आणि नागरी समितीच्या सदस्यांनाही याची कुणकुण लागली होतीच. अण्णांवर पोलीस अटकेची कारवाई करत असतानाच अरविंद केजरीवाल यांनाही पोलिसांनी अटक केली. जनलोकपालच्या दुसर्‍या सदस्या किरण बेदी यांनाही पोलिसांनी अटक केली. पोलिसांना वरुन आदेश आला, त्यामुळे यामागे कोण आहे, ते वेगळं सांगायची गरज नाही ही सरळ सरळ दडपशाही आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया किरण बेदींनी यावेळी व्यक्त केली.

close