शम्मी कपूर यांना अखेरचा निरोप

August 15, 2011 12:29 PM0 commentsViews: 1

15 ऑगस्ट

ज्येष्ठ अभिनेते शम्मी कपूर यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्यावर बाणगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी उद्योगपती अनिल अंबानींसह बॉलीवूडमधले अनेक दिग्गज आपल्या लाडक्या अभिनेत्याला निरोप देण्यासाठी उपस्थित होते. अमिताभ बच्चन, अमिर खान हेही उपस्थित होते. बॉलीवूडसह अनेक सिनेरसिकांनी शम्मी कपूरला श्रद्धांजली वाहिली. त्यावेळी शम्मी , आम्ही तुम्हाला विसरु शकणारच नाही अशाच भावना सगळ्यांनी व्यक्त केली.

close