राळेगणसिध्दीत जेल भरो आंदोलन

August 16, 2011 4:57 PM0 commentsViews: 1

16 ऑगस्ट

अण्णांच्या अटकेची बातमी कळताच अवघं राळेगण आज रस्त्यावर उतरले. गावकर्‍यांनी गावाच्या चौकात येऊन रास्ता रोको केला. गाड्या भरभरून गावकरी स्वत:ला अटक करवून घेत होते. खुंट्या ठोकून भर रस्त्यातच गावकर्‍यांनी म्हशी बांधल्या. म्हशी आणि बैलांवर दडपशाही करणार्‍या नेत्यांची नाव गावकर्‍यांनी संतापाने लिहिली होती. कार्यकर्त्यांनी गाड्या अडवल्या, एसटीला पुढं जाऊ दिलं नाही. विद्यार्थी, महिला, वृद्ध सगळेच राळेगणकर रस्त्यावर आले.

त्यांनी सरकारचा धिक्कार करत, पोलिसी दमनशाहीवर तीव्र संताप व्यक्त केला. आणि जोपर्यंत अण्णा जेलमध्ये आहेत, तोपर्यंत आम्हीही जेलमध्येच राहणार अशी घोषणा दिल्या. अटक करून घ्यायला अजूून गाड्या पाठवून द्या अशीही उपरोधिक विनंती त्यांनी पोलिसांना केली.

त्यानंतर पोलिसांनी 700 ते 800 आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं आणि पारनेरला नेलं. पण काही वेळानंतर या सर्वांची सुटकाही करण्यात आली. संध्याकाळी राळेगण चौक ते यादवबाबा मंदिर अशा मशाल मोर्चाचंही आयोजन केलं गेलं होतं. तर त्याचबरोबर उद्यापासुन साखळी उपोषण करण्याचाही इशारा राळेगणकरांनी दिला.

close