शेतकर्‍यांचे आयुष्य ‘सुजलाम् सुफलम्’ करणारी सोसायटी !

August 15, 2011 7:57 AM0 commentsViews: 30

दीप्ती राऊत, आयबीएन-लोकमत, नाशिक.

15 ऑगस्ट

चळवळीचं ब्रीदवाक्य इ'विना सहकार नाही उद्धार' हे सहकारी तिहास जमा होत चालले आहे. सहकारी चळवळीला उतरती कळा लागत असताना, नाशिक जिल्ह्यातल्या नामपूर विविध कार्यकारी सोसायटीनं हे तत्व कसोशीनं जपले आहेत. म्हणूनच यंदा सभासदांना तब्बल 40 टक्के लाभाऊंश (डीव्हीडंट ) देणारी ही महाराष्ट्रातली पहिली सहकारी सोसायटी ठरली.

गेल्या शंभर वर्षांपासुन नामपूरच्या विविध कार्यकारी सोसायटीने एकमेव ध्यास घेतलाय तो म्हणजे, सभासदांच्या विकासाचा. म्हणूनच यंदा ही सोसायटी आपल्या सभासदांना तब्बल 40 टक्के डीव्हीडंट देवू शकली. सहकार महर्षी जयवंतराव सावंत यांनी घालून दिलेला सहकाराच्या शिस्तीचा परिपाठ सगळेच संचालक पाळत आहे.

चेअरमन अशोक सावंत म्हणतात, पारदर्शक कारभार, काटकसर, संचालक असो वा सभासद कोणालाही उधारी बंद आणि व्यवस्थापनाचा खर्च कमी यामुळे आम्ही हे करू शकलो. याच तत्त्वांमुळे संस्थेने तब्बल 6 कोटींच्या वर झेप घेतली. आणि सार्‍याच्या केंद्रस्थानी आहेत ते पंचक्रोशीतल्या 50 गावांमधील शेतकरी. सभासद शेतकरी भास्कर सावंत म्हणतात, बिगर भांडवली बियाणं, खतं मिळतात. त्यामुळे आम्हाला व्यापार्‍याकडे दात वेंगाळण्याची वेळ येत नाही.

राज्यातील सहकारी संस्था डबघाईस आल्या, त्या संचालक मंडळांनी केवळ स्वत:चा उद्धार केल्यामुळे.संचालकांमधील नेत्यांचे पेट्रोलपंप झाले. पण संस्था मात्र रसातळाला गेल्या, नामपूरची सोसायटी याला अपवाद ठरली. इथंही पेट्रोलपंप आहे, पण नेत्यांचा नव्हे, तर लोकांचा.

कृषिविषयक सेवांपासून सुरू झालेला संस्थेचा कारभार खूप मोठा झाला. आज ही संस्था सहकारी तत्वावर पेट्रोलपंप चालवला जातोय.दररोज 15 हजार लिटर डिझेल आणि 5 हजार लिटर पेट्रोलचा शुद्ध व्यवहार, वेळेवर आणि स्वच्छ धान्याचा पुरवठा करणारं रेशनचं दुकान, साडेतीन हजार टन खताचा वेळेत पुरवठा, 8 लाख रुपयांची औषधांची विक्री, तब्बल 8 कोटींची वार्षिक उलाढाल आणि त्यातल्या 40 टक्के नफ्याचे सभासदांमध्ये, कर्मचार्‍यांमध्ये वाटप, इतर सहकारी संस्था, अडचणीत आल्या की सरकारकडे धावतात. पण नामपूरच्या सोसायटीची सरकारकडे मागणी आहे ती जास्तीचा नफा वाटण्याची कायमस्वरूपी परवानगी मिळावी म्हणून.

अशोक सावंत म्हणतात, आम्हीला जास्तीचा डिव्हीडंट वाटण्यासाठी प्रत्येकवेळी सरकारकडे जावं लागतं. त्यांनी ती मुदत वाढवूनच द्यावी.आदर्श आणि व्यवहार यांच्या जोडीला लोकशक्तीची ताकद मिळाल्यामुळेच नामपूरच्या या संस्थेनं एवढी झेप घेतली.

close