मल्याळी माणूस जपतोय ‘ मराठी अस्मिता ‘

November 15, 2008 8:45 AM0 commentsViews: 11

15 नोव्हेंबर, कोल्हापूरप्रताप नाईकमराठी भाषेबद्दलची अस्मिता ही फक्त महाराष्ट्रातील माणसालाच असते असं नाही, हे सिद्ध केलंय कोल्हापूरमध्ये राहणार्‍या एका मल्याळी माणसानं. केरळचे फादर पईनाडन यांनी मराठीचा अभ्यास केला आहे. एवढंच नाही तर कोल्हापूरमध्ये त्यांनी मराठी अस्मिता केंद्रही सुरू केलं आहे.केरळमधल्या अंगमाली इथं मळ्यालम भाषेत शिक्षण घेतल्यानंतर ते पुढच्या शिक्षणासाठी महाराष्ट्रात आले तेव्हा त्यांना , पुढचं शिक्षण घेण्यासाठी आणि लोकांमध्ये मिसळण्यासाठी मराठी भाषा शिकण्याची गरज असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी पहिली ते दहावी पर्यंतच्या पुस्तकाचा अभ्यास केला. मराठी लोकांशी संभाषण करून ते मराठी भाषा शिकले. ते एवढ्यावरचं थांबले नाहीत, तर त्यांनी मुंबई विद्यापिठाची मराठी भाषेतून एम.ए.ची पदवी मिळवली.पण यातंही आपण खूप काही ग्रेट केलं आहे, असं त्यांना अजिबात वाटत नाही. ' प्रत्येक राज्यामध्ये आपण गेल्यानंतर आपण तिथली भाषा शिकायलाचं पाहीजे, तर तुम्हाला वाटणार मी इकडचा आहे. जो पर्यंत भाषा शिकत नाहीत, तो पर्यंत तुम्ही परदेशी असणार. तुम्ही भाषा शिकायला पाहिजे तेव्हा लोक तुमच्यावर प्रेम करणार तुम्हाला सुद्धा तिकडं कार्य करायला शक्ती मिळणार ' असं ते म्हणतात.त्यांनी मिशनरीच्या माध्यमातून 2000 साली कोल्हापूर जिल्ह्यातील गिरगांव जवळ मराठी अस्मिता केंद्र सुरू केलं. या केंद्रात परराज्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना शास्त्रशुद्ध मराठी भाषा शिकण्यासाठी प्रशिक्षण दिलं जात. एवढचं नव्हे तर हे प्रशिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्रातील लोकांचाही तितकाच सहभाग असतो. आता परप्रंतीय असणारे फादर पॉल यांनी दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांना मराठी भाषेचं प्रशिक्षण दिलंय. मुळचे केरळ मधील असलेल्या पॉलना मराठी भाषेबद्दल नितांत आदर वाटतोय. म्हणूनच ते मराठीची पुढची पिढी घडवण्याचं काम करत आहेत.

close